Please visit MVS YouTube Channel "Topiwalla MVS Events" संघटनेची AGM रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न, नवी कार्यकारिणी नियुक्त माजी विद्यार्थी मेळावा जानेवारी २०२६ चा वृत्तांत आणि छायाचित्रे आता उपलब्ध JEE, NEET आणि CET मार्गदर्शन शिबीर १ ऑक्टोबर २०२६ ला मध्यवर्ती सभागृहात सदस्य नसलेल्या वर्गबंधू-भगिनींना सदस्य बनण्यास उद्युक्त करा. आपले मालवण शहर स्वच्छ ठेवा. मालवणचे निसर्गसौंदर्य आणि पर्यावरण अबाधित राखा.

येवा, ही वेबसाईट तुमचीच आसा!

II सुस्वागतम II

टोपीवाला हायस्कूल, मालवण च्या माजी विद्यार्थी संघटने (MVS) च्या वेबसाईटवर तुमचं सहर्ष स्वागत!

वेबसाईटचा केंद्रबिंदू आहे आपल्या प्रिय शाळेचा "माजी विद्यार्थी"! म्हणजे तुम्हीच. आणि उद्देश आहेत:

  1. तुम्हांला परत मनाने शाळेत घेऊन जाणं
  2. तुमच्या शाळा सोबत्यांशी संपर्क करुन देणं
  3. MVS च्या नवनवीन उपक्रमांची माहिती देणं
  4. तुमच्या आठवणी आणि विचार व्यक्त करायला जागा देणं

चला तर आपली शाळा, मित्र-मैत्रिणी आणि मालवणशी परत एकदा दुवा साधूया. आपल्याच वेबसाइट मधून!

आपली शाळा

रा. ब. अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण

आपली शाळा, आपले स्वाभिमान स्थान, जिने आपल्याला बरेच काही शिकवले, जिथे आपला आपल्या गुरुजनांबरोबर संवाद घडला, आणि ज्यायोगे आपण घडलो, ते शंभर वर्षांपासूनचे विद्यामंदिर

दूरदृष्टी

आपल्या शाळेचे संस्थापक

कै. कृष्णराव सीताराम उर्फ आबासाहेब देसाई
दि. १० एप्रिल १९११ रोजी इतर संस्थापकांच्या मदतीने आबासाहेबांनी शाळेची स्थापना केली, तसेच शाळेचे superintendant म्हणून भरीव कामगिरी केली. नंतर मालवणमध्येच मुलींसाठी त्यांनी कन्याशाळादेखील स्थापन केली.

कै. बाबुराव गोपाळ उर्फ बाबासाहेब वराडकर
संघटना चतुर आणि कर्यक्षम बाबुरावांनी शाळा स्थापनेनंतर अनेकांच्या सहकार्याने शाळेला सुस्थितीत आणले. त्यांची शिक्षणाविषयीची तळमळ आणि चिकाटी यामुळे शाळेने मूळ धरले आणि हा वृक्ष फोफावला.

कै. विनायक वासुदेव उर्फ भाऊसाहेब आजगावकर
साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि मुलांशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे भाऊसाहेब हे १९२९ - ३३ या काळात यशस्वी मुख्याध्यापक राहिले.

कै. डॉ. राजाराम वासुदेव आजगावकर
यांनी आपले वैद्यकीय ज्ञान आरंभीच्या काळात शाळेत प्रथमोपचार, शरीरविज्ञान आणि आरोग्यशास्त्र शिकवण्यासाठी वापरले.

आपल्या शाळेचे मुख्य देणगीदार

रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाले

आपल्या शाळेचे मुख्य देणगीदार रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांनी सन १९११ मध्ये घसघशीत देणगी देऊन आपल्या संस्थापकांना, शाळा सुरु करून एका उच्च प्रतीच्या शिक्षण संस्थेचा आणि समाजात उच्च शिक्षणाचा भक्कम पाया रचण्यास सहकार्य केले. आज शंभर वर्षानंतरही या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी जगामध्ये आपला ठसा उमटवत आहेत, आणि जगात बरेच काही चांगले घडवत आहेत.

रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी

वार्षिक सर्वसाधारण सभा

संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी. सभेत भाग घेण्यासाठी Read More बटन दाबा.


Read More

१ ऑक्टोबर २०२६ ला मध्यवर्ती सभागृहात

JEE, NEET आणि CET मार्गदर्शन शिबीर

JEE, NEET आणि CET मार्गदर्शन शिबीर आपल्या संघटनेचे सदस्य श्री. महेश अभ्यंकर दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यवर्ती सभागृहात घेणार आहेत.

सकाळी ८:०० ते १०:३० - ११ वी व १२ वी विज्ञान

सकाळी ११:०० ते १२:३० - १० वी (टोपीवाला हायस्कूल व जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल)

सभासद नोंदणी

तुम्ही MVS चे सभासद आहात ना? नसाल तर त्वरित हा फॉर्म भरा! आजीवन सभासदत्वासाठी शुल्क आहे फक्त रु १०००!

सभासद नोंदणी फॉर्म
सभासद शुल्क भरा

फॉर्म तर भरला. आणि आता सभासद शुल्क भरायचंय? मग हा QR कोड वापरून भरा, फक्त रु.१०००

प्रोफाइल अपडेट

फॉर्म भरताना स्वतःची सर्व माहिती दिलीत का? फोटो? बघूया मित्र-मैत्रिणी ओळखतात का तुम्हाला! जन्मतारीख? अहो वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी!

माहिती अपडेट करा
मित्र-मैत्रिणी शोधा

नेहमी शेवटच्या बाकावर बसणारा बाळ्या व्यंगचित्रं छान काढायचा. आता खय आसता तो? मित्रमैत्रिणींना शोधायचंय?

सोबत्यांना शोधा
प्रकल्प प्रस्ताव

तुमचा अनुभव आणि कौशल्य वापरून MVS च्या मदतीने आजी/ माजी विद्यार्थी किंवा मालवण शहरासाठी एखादा प्रकल्प राबवायचाय?

प्रकल्प प्रस्ताव पाठवा
देणगी द्या

विविध प्रकल्प, कार्यक्रम आणि दैनंदिन खर्चासाठीही MVS चा निधी लागतो. तुमच्या छोट्याशा देणगीचीही खूप मदत होऊ शकते.

देणगी द्या
प्रशस्तिपत्रे

सभासदांचे अनुभव

Sanjay Eknath Sawant

Retired Engineer

“THSMVS पहिला संपर्क फेब्रुवारी २०२४ रोजी दादर येथील वैद्य सभागृहात संघटनेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात आला. माझा स्वतःचा संरक्षण...”

Read More

Arun Advankar

Business

“अचानक झालेली MVS ची ओळख ११ फेब्रुवारी २०२४ मधे मुंबईत झालेल्या MVS च्या मेळाव्याच्या निमित्ताने माझा अचानक MVS शी परिचय...”

Read More

Trupti Shirodkar

Retired bank employee

“मी आणि MVS २०२३ मधे अचानक मोबाईलवर मेसेज आला की टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद व्हा. शाळेबद्दलची ओढ अजूनही...”

Read More
Our Experience

Start your Journey with Us! Know a Bit

राव बहादूर अनंत शिवाजी देसाई टोपीवाला यांनी मालवण शिक्षण संस्था स्थापन करून, त्या संस्थेच्या माध्यमातून, सन १९११ मध्ये धुरीवाडा मालवण इथे एक शाळा स्थापन केली. त्या शाळेत विद्या प्रसाराची कळकळ असणारे शिक्षक नेमले आणि एक सतत वाहणारी ज्ञानगंगा सुरु झाली. शालेय शिक्षणाला क्रीडेची योग्य जोड देण्यासाठी शाळेपासून पाव किलोमीटर अंतरावर एक खेळाचे मैदानही शाळेला भेट दिले. त्या शाळेचे काही माजी विद्यार्थी एकत्र आले, आणि त्यांनी एकोणीसशे नव्वदीच्या दशकात माजी विद्यार्थी संघटना स्थापन केली. माजी विद्यार्थ्यांची, माजी विद्यार्थ्यांसाठी आणि माजी विद्यार्थ्यांनी चालवलेली ही संस्था माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, शिक्षण आणि मालवण नगर यांना समर्पित आहे.

00

Commitee members

00

Alumni

00

Projects

00

Upcoming Events