Please visit MVS YouTube Channel "Topiwalla MVS Events" संघटनेची AGM रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न, नवी कार्यकारिणी नियुक्त माजी विद्यार्थी मेळावा जानेवारी २०२६ चा वृत्तांत आणि छायाचित्रे आता उपलब्ध JEE, NEET आणि CET मार्गदर्शन शिबीर १ ऑक्टोबर २०२६ ला मध्यवर्ती सभागृहात सदस्य नसलेल्या वर्गबंधू-भगिनींना सदस्य बनण्यास उद्युक्त करा. आपले मालवण शहर स्वच्छ ठेवा. मालवणचे निसर्गसौंदर्य आणि पर्यावरण अबाधित राखा.

Objectives

MVS ची उद्दिष्टे

  1. जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून सभासद संख्या वाढविणे
  2. संघटना चालविण्यासाठी आणि तिची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निधी गोळा करणे, यासाठी तिकिट लावून सांस्कृतिक किंवा इतर (fundraiser) कार्यक्रम आयोजित करणे, तसेच MVS च्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी देणग्या गोळा करणे
  3. सभासदांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, कौशल्य प्रशिक्षण, सहली इ. आयोजित करणे, आणि त्यासाठी निधी, देणग्या गोळा करणे
  4. MES तर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील सध्याच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी काही प्रशिक्षण देणे किंवा आर्थिक मदत देणे यासाठी सभासदांकडून काही प्रस्ताव आलास त्यावर विचार करून, योग्य वाटल्यास MES कडे पाठविणे आणि तो मंजूर झाल्यास संबंधित सभासदांना शक्य तितकी मदत करणे
  5. MES तर्फे चालविल्या जाणाऱ्या एखाद्या शाळेने जर त्यांच्या एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी MVS कडे कोणतीही मदत मागितली तर त्यावर विचार करून, योग्य वाटल्यास आणि शक्य असल्यास ती मदत करणे
  6. मालवण शहरासाठी किंवा शहरातील इतर विद्यार्थ्यांसाठी MVS सभासदांकडून किंवा शहरातील इतर संस्थांकडून शैक्षणिक, क्रीडा, कला किंवा सांस्कृतिक विकासासंबंधी काही सामूहिक प्रस्ताव पुढे आला तर त्यावर विचार करून योग्य वाटल्यास शक्य ते योगदान देणे